Wednesday, February 8, 2023

चिमुकल्यांचे वाढदिवस लेखन आयुब कलाम शेख प्राथमिक शिक्षक पुणे महानगरपालिका

चिमुकल्यांचे वाढदिवस!

आमच्या दुसरीच्या वर्गात कोण्या मित्रमैत्रिणीचा वाढदिवस असला की पोरं वापरलेल्या, न वापरलेल्या पेन्सिली, खोडरबर, पट्टी, पेन, वही यांसारख्या वस्तू भेट देतात.

समुद्रमंथन करून सापडलेला ऐवज गोळा करावा अगदी त्याच नित्यनेमाने वाढदिवसमूर्ती तो खजिना जमवतात.

कित्येक हिरे, मोती किंवा गेल्या बाजारी अमृतापेक्षाही मौल्यवान!

उन्हाने कोमेजून गेलेल्या वेलीवर पावसाचे थेंब पडावेत,अगदी तशीच ही पोरं शहारतात, या भेटवस्तूंनी..

निरागसतेने भारलेले रम्य हे बालपण म्हणण्याची हीच वेळ.

वाढदिवसासाठी भव्य खर्च, केक तोंडाला फासणं, अंडी फोडणं, मोठमोठाल्या हॉटेलला जाऊन जेवण करणं यापेक्षा ही दौलत कितीतरी पटीने मोठी आहे, देणाऱ्याला संकोच नाही घेणाऱ्याला त्याचा कमीपणा नाही.

सध्या छोट्या छोट्या गोष्टींतून सुख शोधणं, हे कोलंबसाने अमेरिका शोधण्याइतकंच महाभयंकर कर्म आहे हे खरं असलं तरी सुखी माणसाचा सदरा आमच्या वर्गात प्रत्येक बालकाकडे आहे याची खात्री आहे. हीच प्रेरणा माझ्याही कामी येते.


आयुब कलाम शेख

प्राथमिक शिक्षक पुणे महानगरपालिका

9552941271

☺️

उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

  उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक' किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वा...