राजहंस! गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी पुणे ग्रुपच्या माध्यमातून नाशिकच्या 'मांगीतुंगी आणि साल्हेर सालोटा' ट्रेक वेळी सकाळी नाष्टा बनवताना एक मुलगा भल्या पहाटे थंडीत कुडकुडत काठ्या विकताना दिसला. त्याची जिद्द, कष्ट आणि गरीबीतही स्वाभिमानाची कमावलेली भाकर पाहून काही ओळी लिहाव्याशा वाटल्या.
गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी पुणे ग्रुपच्या माध्यमातून नाशिकच्या 'मांगीतुंगी आणि साल्हेर सालोटा' ट्रेक वेळी सकाळी नाष्टा बनवताना एक मुलगा भल्या पहाटे थंडीत कुडकुडत काठ्या विकताना दिसला. त्याची जिद्द, कष्ट आणि गरीबीतही स्वाभिमानाची कमावलेली भाकर पाहून काही ओळी लिहाव्याशा वाटल्या.
राजहंस!
भरल्या चांदण्यांच्या अंगणात
हा कुट्ट काळोख कसला?
पोटखळगी भरण्याच्या खटपटीत
कष्टाळू 'राजहंस' एक दिसला!
कसली गुलाबी अन् बोचरी थंडी?
कुणाला मऊ बिछान्याची साखरझोप?
हे सगळं आपल्यालाच लखलाभ
ते मात्र वाळवंटी तग धरणारं रोप!
आमची कॉन्व्हेंटची लाडाची लेकरं
'ऊठ बाळा' म्हणूनही बिछान्यावर,
इथं राजेहो घरादाराची मदार
इवल्याश्या कोवळ्या माथ्यावर!
एसीची हवा, ट्युशनची सलाईन
तरीही गुणांची रात्रंदिन आबाळ,
अशी लेकरं वाळवंटातही फुलवतात
यशाचं देखणं हिरवं आभाळ!
पिझ्झा, बर्गर अन् पार्ट्यांचे
आपले जहागिरदारीचे चोचले,
ब्रँडेड किंमती पायतानातूनही
सुखाचे काटे सतत बोचले!
स्वप्न भविष्याची जप उराशी
जरी असे पाचवीला पुजलेली पडझड,
सूर्य बांधील पडक्या झोपडीला तोरण
लेकरा, फळास येईल तुझी धडपड!
आयुब कलाम शेख.
सदस्य,
गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान,
निमगाव म्हाळुंगी पुणे ग्रुप.
9552941271

