Thursday, December 16, 2021

बहर!



बहर!

ओस पडलेल्या शाळांना

आला शिक्षणाचा बहर,

कोमेजल्या साऱ्या वर्गांत

सजला रानफुलांचा मोहर!


कुण्या संसर्गाची चिमुकल्यांस

येथे बाधा न व्हावी,

पुस्तकं, खेळ, उपक्रमांची

पुन्हा सुसंगती घडावी!


पाखरांचा किलबिलाट ऐकता

शाळा सप्तसुरी सजली,

दोन वर्ष ठणकत्या जखमेवर

गोड स्वागताची खपली!


पुरे शिक्षणाची वणवण

सरीता ज्ञानाची वाहू दे,

गुरुशिष्यांची ही वारी

शाळा-पंढरीत विसावू दे!


आयुब शेख, पुणे महानगरपालिका

दिड-दोन वर्षांनंतर सुरू होणारी शाळा आणि बागडणारी मुलं यांविषयी शिक्षकांची भावना शब्दबद्ध करण्याचा छोटासा प्रयास..

No comments:

Post a Comment

उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

  उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक' किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वा...