Sunday, August 7, 2022

अज्ञात पिंपळ


पिसोळीच्या डोंगरावर संध्याकाळी फिरायला जाणं हा नित्यक्रम आहे माझा.

कुण्या अज्ञात व्यक्तीने किंवा ग्रुपने पिंपळाचं रोपटं लावलेलं आज नजरेस पडलं.

समाजकार्य करून आपलं नाव न लिहिणारी घटना बऱ्याच दिवसांनी किंवा बहुधा पहिल्यांदाच पाहिली, भारी वाटलं...

झेंडे, भोंगे, धर्म खतरेंमें हैं सारखी प्रकरणं चघळत बसणाऱ्यांपेक्षा अशी माणसं खरी देशभक्त असतात. जी मातृभूमीचं ऋण फेडण्यासाठी झटतात.

सध्या पावसाळा आहे म्हणून निसर्ग पोसेलच या पिंपळाला.

पण पाऊस नसेल तेव्हा रोज फिरायला जाताना एक पाण्याची बाटली या छोटुल्यासाठी घेऊन जावी, असा निश्चय केलाय.

एक बोध मिळाला आजच्या या प्रसंगावरून....

कुणीतरी करायला पाहिजे हे जे आपण म्हणतो ना?

ते खरं तर आपण करायचं असतं!

☺️🇮🇳🌳🪴🌱

No comments:

Post a Comment

उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

  उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक' किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वा...