रानमेवा - व्यंकटेश माडगूळकर
नऊ ग्रामीण कथांचा संग्रह.
सुखद ग्रामीण वर्णन, साधी सोपी लेखणी.
भाजी विकणारा तानाजी. पोलीस समोर असताना फक्त 'याच्या आयला' शब्द तोंडातून जातो आणि त्याला दंड होतो, शिक्षा होते गुन्हा नसताना.
काही दिवसांनी पुन्हा भाजी विकत काम करतो मात्र गुन्हेगारीचा ठपका बसल्यामुळे कोणीही भाजी घेत नाही. तो शेवटी दारू पिऊन खरोखरीच पोलिसांना शिव्या देतो आणि 'मला आत टाका' म्हणतो पण पोलीस उत्तरतो,
"पैलवान, पिल्यावर माणसाचा तोल जातो, तोंडातून निघू नये तसला शब्द निघून जातो. शहाण्या माणसाने कानाडोळा करायचा. सरळ निघा घरी." खरोखरीच गुन्हा केल्यावर मात्र सुटका होते. भाजीविक्याची अजब कथा कधीकधी आपल्याही आसपास घडल्याचा भास होतो.
वपु काळेंच्या कथांची चटक लागल्याने यात एवढा रस वाटला नाही.
😍
आणखी एक आवडलेली कथा...
मिरी आणि सुबी. आठ नऊ वर्षांच्या पोरी. सुबीच्या आईने पोरांसाठी नवरा वारल्यावर केलेले समाजाच्या दृष्टीने पातक.
ब्राह्मण मिरीची आई मैत्री तोडायला सांगते. पण बाबांना डबा घेऊन जाणाऱ्या मिरीची मुक सोबत करते सुबी. पोळणाऱ्या सुबीच्या पायांना मिरी स्वतःची चप्पल देते. बाबांनी दिलेला आंबा मूकपणे अर्धा अर्धा दोघी वाटून खातात, अगदी चार पाच पावलं अंतर राखत..
मिरी आणि सुबीची जात विरहित मूक घट्ट मैत्री काळजाला स्पर्श करते.. अशाच अवीट गोडीचा रानमेवा...
पुस्तक मिळवून नक्की वाचा.
रवी काळे सरांकडून पुस्तक वाचनासाठी प्राप्त झाल्याबद्दल आभार!
😍💐

