Monday, May 12, 2025

धमाल भटकंतीची कमाल शिकण्याची -शिवराज पिंपुडे अभ्यास सहलींच्या अनुभव कथनाचा सुंदर आविष्कार! लेखन आयुब कलाम शेख पुणे महानगरपालिका

 


धमाल भटकंतीची कमाल शिकण्याची

-शिवराज पिंपुडे

अभ्यास सहलींच्या अनुभव कथनाचा सुंदर आविष्कार!

शिकणं या स्वाभाविक प्रक्रियेला चार भिंतीत मर्यादित करून चालणार नाही. त्यामुळे गडकिल्ले, वीरगळी, मंदिरं, अभयारण्य, समुद्र, लेणी, आकाश निरीक्षण यांचा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिलेला अनुभव त्यांच्या आयुष्यभर स्मरणात राहील.

उघडे डोळे आणि चालणारे पाय यांना जोड मिळते प्रयोगशील अनुकरणीय उपक्रमांची तेव्हा सृजन घडते. 'आपण जे काही केलं ते समाजापुढे आणणं' महत्त्वाचं मानून उपक्रमांचं सार शब्दबद्ध केलंय लेखकाने. ते तशाच निगुतीनं नटवलंय अन् सादर केलंय आपल्या पुढ्यात. खरं तर अनुभवांचा हा एक प्रगल्भ वस्तुपाठच म्हणावा लागेल सर्व शिक्षकांसाठी.

मला तर वाटतं, इथल्या प्रत्येक शिक्षकांच्या हाती लागावेत असे दिवे, जे उजळतील शिक्षणव्यवस्थेचं भाग्य. जिथे मग नोकरी म्हणजे फक्त पैसे कमवण्याचं एक साधन न राहता नवनिर्माणाचं विद्यापीठ ठरेल. मुलांना देता येतील पाठ्यपुस्तकाखेरीज चाकोरीबाहेरचे कित्येक अनुभव अन् समृद्ध होतील त्यांच्या ज्ञान ग्रहणाच्या कक्षा.

शिक्षणाची नवी वाट चोखळणारं हे ह्रदयसंवादरुपी पुस्तक मिळवून नक्की वाचा.

धन्यवाद.

आयुब कलाम शेख 

प्राथमिक शिक्षक पुणे महानगरपालिका 

9552941271

🙏🏻😍📚✌🏻🍫🌹

No comments:

Post a Comment

उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

  उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक' किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वा...