अंधारातही प्रफुल्लित व्हावा,
अनामिकाच्या करुणेचा नंदादीप
सकलांसाठी शब्दाशब्दांत पाझरावा.
नात्यांची वीण घट्ट करणारा
मुहूर्त प्रत्येक क्षणी सापडावा,
प्रेम रुजवण्याचा मंगल संकल्प
दिवसागणिक मनी जागवावा.
यशात माझ्या मी अखंड कष्टांचा
जागता पहारा ठेवावा,
दुःखात त्यांच्या मी सुखाच्या
उटण्याचा सुगंध पेरावा,
मलूल, उदास चेहऱ्यांची शोभा
हर्षोल्लासाने गोजिरी व्हावी,
अंतःकरणाच्या सृजनाची दिवाळी
घरोघरी आजन्म साजरी व्हावी!
दीपावलीच्या प्रकाशमयी शुभेच्छा!
आयुब कलाम शेख.

No comments:
Post a Comment