बहीण
माझी बहीण बहीण
कशी संसारी सुगरण,
आईच्या हातच्या चवीची
तिच्या हाताला पखरण!
भावाची पाहता भरास
नयनी दाटे समाधान,
पाठी जन्मलो तिच्या
जगी ठरलो पुण्यवान!
अशी लाभली बहिण
माझी किती गुणवान,
घराचा उंबरठा खुला
नको बघू आवताण!
दुःख होतं नशिबी
सुखाला तूच कारण,
गोकुळ झालं घराचं
फिटे डोळ्याचं पारणं!
किती राबली बहिण
पुरं केलं माझं शिक्षण,
तिच्या टिचभर सुखासाठी
ठेवीन जिंदगी गहाण!
✍🏼
आयुब कलाम शेख,
पुणे महानगरपालिका.
9552941271
भावावर नितांत प्रेम करणाऱ्या माझ्या आणि जगातल्या सर्व बहिणींना समर्पित!
Happy Rakshabandhan....
☺️🍫
No comments:
Post a Comment