Sunday, August 27, 2023



निरामाई,

आईच्या दुधावर अन् निरा नदीच्या पाण्यावर पोसलो.

शहाळ्यासारखंच गोड पाणी.

निराच पुढे भीमा होऊन पंढरपुरी वाहते.

या नदीला आटलेली पाहिलीच नाही कधी.

एखादी गोष्ट अतिपरिचयाची झाली की तिचं फारसं कौतुक राहत नाही, तसंच बहुतेक वेळा नदीशेजारच्या गावांचं होतं.

माझं मात्र तसं कधीच झालं नाही, नदीवर गेलो की मन शांत होतं.

नदीच्या गावात जन्माला येणं तसं भाग्यच म्हणायला हवं.

दहावीच्या गेट टुगेदरचं नियोजन करण्यासाठी आज दत्तघाटावर आम्ही मित्र जमलो, तेव्हा घेतलेला फोटो!

बालपण पुन्हा डोळ्यांसमोर लख्ख उभं राहिलं!

नदीकडे वाहवत गेलो, अगदी नदीसारखंच!

लेखन

आयुब कलाम शेख पुणे महानगरपालिका

9552941271

☺️

No comments:

Post a Comment

उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

  उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक' किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वा...