Saturday, September 23, 2023

दीपक गायकवाड सरांचा वाढदिवस लेखन आयुब कलाम शेख पुणे महानगरपालिका

दीपक गायकवाड सर म्हणजे उत्साहाचा 'धबाबा तोय आदळणारा' धबधबा!

स्वतःजवळील प्रचंड ऊर्जा सकारात्मक कार्यात मार्गस्थ लावणारे गायकवाड सर कुसुमाग्रजांच्या सुंदर, सजीव कवितांसारखेच मला नेहमी वाटतात. ज्यांच्या सान्निध्यात नेहमी काहीतरी नवीन माहिती पदरी पडते.

पाईक शिवबाचे ग्रुप स्थापन करून सरांनी कित्येक गडभ्रमंतीची आम्हाला संधी दिली. आधी दोनतीनदा पाहून आलेला गड सरांच्या नजरेतून किंवा सरांच्या त्या प्रसंग सांगण्याच्या शैलीतून पुन्हा नव्याने पाहता येतो. सरांमुळे बरेच किल्ले पाहिले. भरपूर फिरलो. प्रत्येक क्षेत्रातली सरांना अगदी इत्यंभूत माहिती असते.

कल्पवृक्षाच्या सावलीखालून सुद्धा काहीजण कोरडे निघून जातात, आम्ही मात्र या अनुभवसंपन्न पावसात चिंब भिजलो, भिजतोय अजूनही.

परीटघडीच्या चेहऱ्याच्या काही माणसांना हास्याची मैफल आवडत नाही. सर मात्र दिलखुलास हसतात. 'खळाळणारं' त्यांचं ते हसणं मला फार आवडतं.

सावली देऊ शकणाऱ्या या वटवृक्षाने विश्रांतीला येणाऱ्या पांथस्थाला, बाकीची झाड सोडून तुला नेमका मीच कसा सापडलो? असा सवाल कधी केला नाही. सरांचा स्पष्टवक्तेपणा, मदत करण्याची तयारी, तंत्रज्ञानाचा वापर हे गुण नेहमी भावतात.

प्रत्येकासोबत असा एक 'दीपक' असायलाच हवा आणि त्या उजेडात अख्खा महाराष्ट्र पिंजून काढावा, ही मनिषा उराशी बाळगत वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा देतो!

सर आरोग्यसंपन्न शतायुषी व्हा!

🍫🙏🏻☺️💐🎊

No comments:

Post a Comment

उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

  उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक' किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वा...