Thursday, October 26, 2023

दसरा आणि सरांच्या गाडीला हार

अनुजा,

दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तिने हार बनवून आणला. परिपाठापूर्वीच सरांच्या गाडीला लावलासुद्धा. मधल्या सुट्टीत जेवताना मला आवर्जून सांगून गेली. संध्याकाळी शाळेतून घरी जाताना पार्किंगला गाडी पाहिली. गाडी मात्र लाजून खुदकन हसत होती.

सरांच्या गाडीला हार बांधावा, ही तिची चिमुकली कल्पनाच किती आल्हाददायक वाटतेय. ही आपुलकीच एखाद्या शिक्षकाची खरी मिळकत म्हणायला हरकत नाही.

या निरपेक्ष भावनेला अन् निरागस प्रेमाला तोड असेल?

😍☺️

No comments:

Post a Comment

उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

  उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक' किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वा...