जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा...
वाचणं एक प्रकारे पेरणं असतं तर लिहिणं हे उगवणं. उगवण्याच्या अपेक्षेआधी पेरायला हवं. एक दिवस तुमच्या सुपीक शेतात पिकवलेलं धान्य लोकं पेरण्यासाठी घेऊन जातील!
खपण्यासाठी खूप पुस्तकं छापली जातात, आपण जपण्यासाठी एखादं तरी पुस्तक निवडावं.
वाचनाचा छंद माणसाला धुंद करतो.
नागराज मंजुळे म्हणतो,
एकट्या दुकट्या माणसानं,
स्वसंरक्षणार्थ काही बाळगांव
म्हणून मी पुस्तकं बाळगतो!
पाडगांवकर म्हणतात, "मी रियाज करतो लिखाणाचा, ठराविक वेळी लवकर उठून, आठवून!
सतत वाचणं, ऐकणं, पाहणं हा रियाज असतो. कवितेचा एक क्षण असतो, त्याला त्याच वेळी सजवता यायला हवं. शब्दांचा साठा साठवायला हवा. कवी शब्दांचा पाऊस साठवतो आणि योग्य वेळी वापरतो.
वाचनाची आवड असण्यापेक्षा व्यसन असावं माणसाला. कारण व्यसनासाठी माणूस वेळ काढतोच. आवडीसाठी सवड काढावी लागते.
जागतिक पुस्तक दिनाच्या ज्ञानमयी शुभेच्छा!
📚📖🌹🍫😇🏆

No comments:
Post a Comment