Thursday, June 13, 2024

Shrikanth movie

 



Shrikanth!😎

जन्मतःच दृष्टी नसलेल्या मुलाला समाज कचरा समजतो. आयुष्यभराच्या अंधत्वाच्या यातनेतून सुटका म्हणून जमिनीत पुरायला निघालेल्या बापाला आई थोपवते. अन् तोच मुलगा 'अकरावीपासून ब्रेललिपीतून सायन्स' शिक्षणासाठीची कोर्ट केस जिंकून कित्येक visual disable साठी नव्या युगाची नांदी ठरतो.

न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावण्यापूर्वीही कित्येकांनी सफरचंद जमिनीवर पडताना पाहिलं होतं की, सवाल बघणं किंवा डोळ्यांचा नव्हताच मुळी. महत्वाचं होतं विचार करणं, कारणमीमांसा तपासून पाहणं.

मालविका टिचरने आपल्या या विद्यार्थ्याला दिलेली दिशा, सपोर्ट आणि संधी यांची बरोबरी कशासोबतच होऊ शकत नाही, एखाद्याच्या फाटक्या आयुष्यात इंद्रधनुष्य होण्याचा प्रयत्न शिक्षक किती सुरेख पद्धतीने करू शकतात. 'रवी' नावाचा मित्र विश्वास ठेवतो, साथ देतो, समजून घेतो. अशी परिसासारखी माणसं सोबत असली तरच लोखंडाचं सोनं होतं, हे चित्र काय सुरेख रंगवलंय!

लहानपणी मित्रांसोबत भांडणं झाली तर मार खाण्याऐवजी तू पळून का जात नाहीस? या वडीलांच्या प्रश्नावर दिलेलं समर्पक उत्तर "मैं भाग नहीं सकता, सिर्फ लढ़ सकता हूँ!" आपल्याला जगण्याचा नवीन आयाम प्राप्त करून देतो.

अंधेरोंको कोसने से ज्यादा बेहतर है,

की एक शमा दिलमें जला दी जाये!

ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी २५ लाख रुपये स्टार्टअप साठी दिलेला हा shrikanth!

वेळ काढून ' डोळे लख्ख उघडणारा अंध हिरोचा डोळस चित्रपट' नक्की पहा, आपल्या लेकरांनाही दाखवा.

😍

अमोल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 


अमोल,

गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान ग्रुपच्या माध्यमातून 'पदरी पडून पवित्र झालेलं' एक अनमोल माणिक!

हुशार, स्मार्ट, सहकार्यशील, हसरा, माझे ढिगभर फोटो काढून उभे-आडवे-तिरपे व्हिडिओ काढणारा, निमगावातून माझ्यासाठी सीट पकडणारा, एकत्र चहा, नाष्टा, जेवण आणि सगळंच सोबत...

आता तर त्याने वाढदिवसाला ऍप्पल घेतलाय, आता काय कुणाची...😝

काही माणसं जीवनात अपरिहार्य असतात, तर काही ट्रेकमध्ये..

खरं तर,

कम लोग हो, पर अपने हो...

जिंदगी तमाशा थोडी है,

की भीड चाहिये?

अमोल, तुझ्या कौतुकाचा पाढा वाचताना कुणाला किती आनंद होतो माहीत नाही, पण माझी कॉलर नेहमीच ताठ राहणार भावा.

तुझ्यासारखा प्रतिक्षणी आनंदी राहण्याचा वसा घेतला की आयुष्याची कोजागिरी मावळतच नाही, हेच खरं.

तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

खूप मोठा हो...

फोटोग्राफीत तुला आणखी कौशल्य मिळू दे, हीच सदिच्छा..

😍😝🍫

झाडवाटा आनंद यादव

 


झाडवाटा

-आनंद यादव

रोजच्या घडणीच्या ग्रामीण कथा. या कथा महाराष्ट्राच्या अस्सल मातीतून उमलून आलेल्या वाटतात. जीवनाची अंगोपांगं धुंडाळत राहणाऱ्या विविध रूपाने अवतरलेल्या गावातल्या कथा मातीशी नाळ जोडू पाहतात.

आवडलेली, चित्तथरारक कलाटणी लाभलेली 'एका दगडी घराचा इतिहास' कथा. बदला घेत कुणालातरी मारून संपत्ती लुबाडणाऱ्या एका पिढीचं संक्रमण तिसऱ्या पिढीपर्यंत पोहोचतं. तेवढ्यात....

"खुळा आहेस तू. डोळ्यातली सगळी जळमटं काढून टाक. ज्याला त्याला ज्याची त्याची फळ मिळाली, मिळणार. आपण आपल्या माणसांबरोबर सुखी राहायचं, माणसात वावरायचं. काळ बदलतोय, वेगळा विचार करायचा!"

कथेतले हे समंजस बोल शेवटी काळीज जिंकतात.

पुस्तक मिळवून नक्की वाचा.

😍

अनुबंध शांता शेळके

 अनुबंध

शांतस्वरूपिणी शांता शेळके 



अनुबंध 

शांतस्वरुपिणी शांता शेळके 

१४भावनिक कथांचा संग्रह.

छोट्या रानफुलांसारख्या निर्मितीच्या पाऊलखूणा उमटवत, फुलवत कथा आभाळाला स्पर्श करू पाहतात आणि वाचनात आपण कधी गुंग होऊन जातो, कळतही नाही.

साहित्य संमेलनाच्या आळंदीच्या अध्यक्षा शांताबाई संमेलन झाल्यावर अरुणाताई ढेरेंसोबत बांगड्या भरून आनंद साजरा करतात, एवढं साधंपण! मनाची श्रीमंती! त्यांनी भरभरून भाषेवर प्रेम केलं, याची प्रचिती कथा वाचताना येते.

शांताबाई नाव उच्चारलं की त्यांचं काव्य आठवतं...

काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी,

मजफुल ही रुतावे,हा दैवयोग आहे!

लोकांच्या संबंधांबद्दल खुमासदार चर्चा करणारी रजनीताई पद्मनाभ आणि शोभा यांच्याविषयी चर्चा करते. पद्मनाभ लालबुंद होत, "आम्ही प्रेम करतो, तुम्हीही करून बघा कोणावर. पण छे! ते शक्य नाही,तुमच्या बाबतीत. तुम्ही अशाच रजुताईच राहणार, अगदी मरेपर्यंत."

प्रेम प्रेमिकांच्या प्रेमसंबंधातली कोणत्यावेळी केलेली कोणती ढवळाढवळ तिला भोवली, त्यातल्या कुणाचा तळतळाट तिला बाधला की ती आजन्म प्रेमापासून पारखी राहिली! या आशयाची 'कोडे' कथा काळजाला स्पर्शून जाते.

पुस्तक मिळवून नक्की वाचा.

😍

उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

  उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक' किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वा...