कुंदा...
घमघमाट नसला तरी मंद सुगंधाचं फूल. स्वीट्सच्या दुकानातला कुंदा जितका गोड तितकंच हे फूलही गोड.
मात्र याची खासीयत मंद सुगंधात किंवा उमललेल्या फुलांत नसून त्याच्या कळ्यांमध्ये आहे. गुलाबी रंगाच्या छटा असलेल्या कळ्यांचा गुच्छ नजरेत भरतो. फूल पाहता क्षणी जरी शुभ्रकांतीचं असलं तरी त्याचा पृष्ठभाग गुलाबी छटांचा असतो. कुंदा फुलताना कळ्यांच्या रंगाचा विसर पडू देत नाही, हे भारी आहे.
घरी आणल्यावर पटकन वाढत नाही अन् फुलंही लवकर येत नाहीत. पण एकदा सेटल झालं रोपटं की मग कुंदाच्या बहराचं दर्शन घडते.
काही माणसं अशीच हळूहळू परिचित होतात. पटकन स्वभाव कळत नाही, पण एकदा wavelength match झाली की मग बहरच बहर!
मग त्यांची कधीच 'अतिपरिचयात अवज्ञा' होत नाही.
लेखन
आयुब कलाम शेख पुणे महानगरपालिका
9552941271
☺️😍

No comments:
Post a Comment