Thursday, September 7, 2023

कथा आदर्श गायकाच्या निवडीची! लेखन आयुब कलाम शेख पुणे महानगरपालिका

 


कथा आदर्श गायकाच्या निवडीची!

एक अनामिक राजा. त्याचं संपन्न असं राज्य. भला मोठा राजवाडा होता. राजाला आपल्या राज्यातील आदर्श गायकाच्या निवडीची कल्पना सुचली त्याने त्याच्याच ओळखीच्या एका व्यक्तीला 'आदर्श गायक' निवडीचे अधिकार बहाल केले. मात्र मेख अशी होती की ती व्यक्ती काही प्रमाणात'बहिरी' होती, संगीत या विषयाशी त्याचा सुतराम संबंध नव्हता. त्यामुळे संगीत क्षेत्रातील 'कर्तव्यशून्य' म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशा प्रकारची. आदर्श गायकांच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. विविध अष्टपैलू गायकांची यासाठी वर्णी लागली असती मात्र त्याने त्याच्याच सोबत फिरणाऱ्या 'बेसूर' गायकाची निवड केली. सगळ्यांना हे जाणवत होतं, मात्र ही निवडीची प्रक्रिया किती बावळटपणाचं ढोंग होतं, याची जाणीव झाल्याने कोणीही उघडउघड प्रतिक्रिया देत नव्हतं.

अनभिज्ञ राजाने खर्च करून जंगी कार्यक्रम आयोजित केला.

सांगण्याची गोष्ट अशी की,

यात चूक कोणाची?

प्रजेकडून तीन उत्तरे मिळाली.

पहिली चूक राजाची ज्याने जानकाराची निवड केली नाही.

दुसरी चूक त्या संगीताविषयी अज्ञानी असणाऱ्या मात्र 'मीच किती शहाणा' असं मिरवणाऱ्या व्यक्तीची.

आणि सगळ्यात गंभीर आणि दुर्लक्ष न करता येण्यासारखी चूक त्या बहाद्दराची ज्याने आपण 'आदर्श गायकासाठी' पात्र नसतानाही केवळ वशिल्याखातर तो सत्कार स्वीकारला...

अंतर्मुख होऊन विचार करणं म्हणजेच प्रामाणिक जगणं असतं...

मोठमोठी भाषणं देणं, नावापुढे पदव्यांची आरास बांधणं, थोर महापुरुषांच्या विचारांची लाखोली वाहणं म्हणजे सगळं काही नसतं...

तुमचं काम दिसतंच,

कोंबडं झाकलं म्हणू सूर्य कसा उगवायचा थांबेल?

(ही कथा केवळ काल्पनिक आहे, याचा जीवित घटकांशी अथवा घटनेशी कोणताही संबंध नाही. तसा आभास झाल्यास तो केवळ एक योगायोग समजावा.)

✍🏼

आयुब कलाम शेख,

पुणे महानगरपालिका

9552941271

1 comment:

उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

  उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक' किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वा...