पुरीभाजीचं प्रेझेंटेशन!
कधी कधी प्रेझेंटेशन खूपच महत्त्वाचं असतं.
आपल्याकडे असणारं किंवा आपल्याला जे काही व्यक्त करायचंय ते सर्व काही समोरच्यापर्यंत योग्य मार्गे पोहोचवणंही तितकंच सहज, सुलभ व्हायला हवं.
'असं केल्याने तू खड्ड्यात जाशील' ऐवजी 'मला असं वाटतंय, तू एकदा अशाप्रकारे विचार करून बघ' हे सांगणं जमायला हवं.
मोठमोठ्या गोष्टी समजण्याऐवजी छोट्या छोट्या गोष्टी handle करता येणं हे खरं सामंजस्यत्व!
प्रेझेंटेशनचं कौशल्य आत्मसात करायला हवं. मग ते कोणत्याही क्षेत्रातलं का असेना. 'बाप' फिलिंग यायला पाहिजे.
सासवडमध्ये पुरीभाजीचं प्रेझेंटेशन बघून विचार प्रेझेंट करण्याचा मोह आवरला नाही...
लेखन आवडत असेल तर, कमेंट्स करत चला. त्यायोगे माझंही प्रेझेंटेशन योग्य पद्धतीने सुरू आहे, याची पोचपावती मिळत राहील!
😍

No comments:
Post a Comment