Saturday, October 14, 2023

ठिपक्यांची रांगोळी आणि गणित लेखन आयुब कलाम शेख पुणे महानगरपालिका


https://youtu.be/WAWy-b0UaYw?si=jJRQOoeQ95t760t3


ठिपक्यांची रांगोळी आणि गणित

इयत्ता तिसरीच्या गणित पाठ्यपुस्तकातील 'बंदिस्त आणि खुल्या आकृत्या' हा घटक ठिपक्यांची रांगोळी या आनंदी शनिवारच्या कृतीतून आम्ही शिकलो. शिक्षण तर झालंच शिवाय मज्जाही भरपूर आली.

रांगोळीचा वहीवर सराव करून सरांनी आणलेल्या ३×३, ४×४,... ९×९ अशा झेरॉक्सवर ठिपक्यांची रांगोळी काढली. अधिक माहितीसाठी रांगोळीच्या कलर प्रिंट भिंतीवर चिटकवलेल्या होत्याच. नंतर या कागदावरील रांगोळीत रंग भरले.

आणि शेवटी प्रत्यक्ष रांगोळी रेखाटन केले.

पालक प्रत्येक शनिवारी यासाठी सहकार्य करतात.

कृतीयुक्त शिक्षणाची मज्जाच न्यारी!

आयुब कलाम शेख

म.न.पा.शाळा क्र.१७४बी,

कोंढवा बुद्रुक, पुणे.

☺️🙏🏻💐

No comments:

Post a Comment

उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

  उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक' किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वा...