Wednesday, October 18, 2023

मनुरे सरांच्या समता प्राथमिक विद्यामंदिर, सय्यदनगर शाळेत

 

मनुरे सरांच्या समता प्राथमिक विद्यामंदिर, सय्यदनगर शाळेत पालकसभेत पालकांना मार्गदर्शन करावं या विनंतीला मान देत अर्धी रजा टाकून उपस्थित राहिलो.

शाळेतलं स्वागत, संचालकांनी आपुलकीने केलेली विचारपूस, सभेसाठी उपस्थित भरगच्च पालक, विद्यार्थ्यांचे इंग्रजी, मराठीतून जबरदस्त सादरीकरण झाले. (फळे, फुले, body parts, about myself, इ.)

चौथीच्या वर्गातल्या पोरांनी मोठं होऊन IAS, IPS, COLLECTOR बनण्याची इच्छा व्यक्त करावी, एवढी पोरं चाणाक्ष. आपण मार्गदर्शनासाठी आलोय की, स्वतः प्रेरीत व्हायला आलोय, याच संभ्रमात पडत माझ्याजवळ जे होतं ते पालकांच्या पदरी टाकत निरोप घेतला.

मनुरे सरांच्या कार्याविषयी आदर आणखी वाढला. स्वतः इतकं छान काम करत असताना या प्रयोगशील शिक्षकानं आपल्याला का बोलवावं? हाच प्रश्न सतावतोय.

असो, मलाच आज शिकायला मिळालं, हे मात्र उगवत्या सूर्याइतकं प्रखर सत्य!

एक गोष्ट आवर्जून अधोरेखित कराविशी वाटली.

'क्षणागणिक बदलत्या या जगात काहीही झालं तरी एक गोष्ट कधीच बदलायची नाही, ती म्हणजे आपले प्रामाणिक प्रयत्न!'

☺️

No comments:

Post a Comment

उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

  उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक' किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वा...