Wednesday, October 18, 2023

ज्योतीताई मोरे मॅडम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

 

ज्योतीताई मोरे मॅडम

म्हणजे एक हसरं, प्रसन्न व्यक्तिमत्त्व!

कोणाबद्दल टिका नाही, असूया नाही. आपल्या कामात आपण मग्न.

उशीर होणारे बरेच असतील पण यांची वेळ सगळ्यांच्या लक्षात येते. 🤣

पण एकदा का वर्गात गेल्या की त्यांना शिकवण्यातून कधीच उसंत नसते, याचा अनेकदा प्रत्यय येतो.

अडचणींचं गाऱ्हाणं गाण्याऐवजी स्मित हास्याचा सूर छेडत ती वेळ टाळून नेण्याचं त्यांचं कौशल्य आत्मसात करायला हवं, खरं तर...

सूर्यापेक्षा माझाच उजेड किती जास्त अशी घोडदौड करणाऱ्यांच्या शर्यतीत मोरे मॅडमसारख्या प्रामाणिक, स्वयंप्रकाशी काजव्याचा उजेड मला अधिक महत्त्वाचा वाटतो.

माझ्या लहान बहिणीचा आणि मोरे मॅडमचा वाढदिवस एकाच दिवशी असल्याने ही तारीख माझ्या कायमची लक्षात राहिली.

ज्योतीताई,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

☺️🙏🏻

No comments:

Post a Comment

उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

  उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक' किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वा...