Wednesday, October 18, 2023

दत्तात्रय वारे गुरुजी

ज्या जागेत काम करण्यात आयुष्य जाणार आहे, ती जागा सुंदर बनवा. पाट्या टाकण्यासाठी किंवा केंद्रप्रमुखांसाठी नव्हे! स्वतःच्या आनंदासाठी काम करा आणि वाबळेवाडीसारखी शाळा बनवायची असेल तर मुलांचं ऐकत चला.

"हा बाबा आपल्यासाठी रात्रंदिवस राबतोय," असं मुलांना वाटलं पाहिजे. मुलांचा 'मेसेज' पकडतो तो चांगला शिक्षक असतो.

आपण पैसा नाही माणसं जोडायची. पोरं उभी करायची आणि सोबत समाजही उभा करायचा. एकदा लोकं सोबत आली की शाळा सुधारणे औपचारिकता ठरते. वाबळेवाडीकरांनी मनावर घेतलं तर एकाच जत्रेत पाण्याचा प्रश्न सुटला होता. लोकं कामाची दखल घेतात तेव्हा आपलं बरोबर चाललंय, असं समजावं. संघर्षात आपलं काम, आपले लोक आपल्याला वाचवतात. आपण अधिकचा वेळ विद्यार्थ्यांना द्यायला हवा.

- राष्ट्रपती पुरस्कार विजेते,

दत्तात्रय वारे गुरुजी

No comments:

Post a Comment

उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

  उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक' किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वा...